Search Badges Account

तुमच्यासारखाच एक छोटासा मुलगा, त्याचं हरवलेलं काहीतरी खूप वेळ शोधतोय. ते सापडतं, तेव्हा काय होतं, जरा विचार करा बरं! पण त्यापेक्षा ही गोष्ट वाचा, म्हणजे तुम्हालाच कळेल ती गंमत.

सोना मूळचीच हुशार. तिनं आपल्या बाबांना कशी मदत केली, हे तुम्ही कदाचित वाचलं असेल. या गोष्टीत, आई जे काम करते आहे, तेच तिलाही करायचं आहे.

तुम्ही घरी किंवा शाळेतही रांगोळ्या पाहिल्या असतील. पण तुम्ही आकाशातली रांगोळी कधी पाहिलीय? सुशीलानं हे कसं केलं, ते तुम्हाला या पुस्तकातून समजेल.

हजारो वर्षांपूर्वी हेमचंद्र नावाच्या भारतीय विद्वानाने वैशिष्टयपूर्ण असा अंकांचा क्रम शोधून काढला. त्यानंतर एका शतकानं, इटालियन गणिती फिबोनाची याचेही त्याकडे लक्ष वेधले गेले व त्याने तो क्रम प्रसिध्द केला. त्या गणिती क्रमांना पुढे फिबोनाकी क्रम असे नाव मिळाले. समजायला अतिशय सोपा असलेला हा गणिती क्रम निसर्गातही आपल्याला फुलांमध्ये, शिंपल्यांमध्ये, अंडयांमध्ये, बियांमध्ये, चांदण्यांमध्ये … पाहायला मिळतो. ह्या पुस्तकात ह्या क्रमाविषयी आणखीन थोडं जाणून घेऊ यात, चला तर मग …

कासव आणि सशाची गोष्ट तुम्हाला माहीतच असेल. पण पुढे काय झाले त्यांचे? वाचा ’ससा आणि कासव’मध्ये.

समुद्राच्या तळाशी प्रवाळबेटांचं एक मस्त जग आहे. चला बघूया… तिथे अगदी वेगळेच आणि फार सुंदर असे समुद्री जीव दिसतील.

मोठं, छोटं, गोलगोल, चौकोनी, जड, हलकं. घरं खूप प्रकारची असतात…ती वेगवेगळ्या प्रकारची का असतात, ते समजून घेऊया आणि स्वतःचं घर तयार करूया.. घर कसं तयार करतात, ते आमची छोटी आर्किटेक्ट दाखवेल ना तुम्हाला!

वार्षिक केशकर्तन दिन या गोष्टीत, शृंगेरी श्रीनिवास रागाने आपले केस ओढत होता. केळीच केळी मध्ये त्याला एक भारी कल्पना सुचली होती. केवढा हा गोंगाट मध्ये शेवटी, त्याला हवी असणारी शांतता मिळाली. या गोष्टीत मात्र, हा लांब केसाचा चक्रम पण लोभस शेतकरी, खूप खूप रागावतो.

आपल्याला एखाद्या गरुडासारखं किंवा विमानासारखं आकाशात उडता यावं, असं सरलाला नेहमी वाटायचं. “तुलाही नक्कीच त्यांच्यासारखं उडता येईल”, तिला शाळेतल्या नव्या ताई म्हणाल्या. उडणं आणि विमानं या दोन्ही गोष्टींबद्द्ल सरला काय काय शिकली, ते ती आपल्याला या पुस्तकात सांगते आहे.

भारतातल्या पर्णाच्छादित जंगलात वरचं जग आणि खालचं जग, ही दोन्हीही जगं परस्परांकडं नेहमीच संशयानंच बघायची. पण ज्यावेळी गोपा रानउंदराचं पुस्तक चुकून खाली फातिमाच्या डोक्यावर पडलं, त्यावेळी मात्र हे सगळं बदललं. जंगलामधली जैवविविधता आणि मैत्री यांबद्दल असणारी ही छानशी गोष्ट.